शालेय यशोगाथा




कर्तुत्व व दातृत्व एकत्र येते जेव्हा.........
                 माळरानही फुलते तेव्हा.
श्री धामणे वैजीनाथ विलास (सहशिक्षक)
जि.प.प्रा. शाळा भोरमाळ हंगेवाडी
ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर मो.9921091991

आयुष्यात कोणतीही गोष्ट मिळवायची म्हटलं की सहजा सहजी मिळत नाही. त्यासाठी परिश्रम, मेहनत घेतल्यानंतर निश्चित यशप्राप्ती होते हे ही तितकेच खरे आहे. आपली शाळा स्वच्छ सुंदर सर्व भौतिक सुविधायुक्त करण्यासाठी लोकसहभागातून साकारलेल्या एका शाळेची ही कहाणी.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिंचणी धरणाच्या खालील बाजुस हंगेवाडी हे गाव. हंगेवाडी गावातील ईशान्येस घोड कॅनॉलच्या बाजूस माळरानावर जि.प. प्रा. शाळा भोरमाळ ही शाळा वसलेली. भोरमाळ म्हटल्यास सहजासहजी गावातील लोकांच्या लक्षात येत नाही कारण याच वाडीला बेडकी असेही म्हणतात. हंगेवाडी गावाजवळून हंगा नदी वाहते. जवळच घोड कॅनॉल वाहतो. याच महसूल गावच्या अंतर्गत येणारी भोरमाळ ही शाळा सुमारे 50 ते 55 कुटुंब लोकवस्ती, सर्व पालकवर्ग हा सधन शेतकरी आहे.
13 जून 2008 रोजी आंतरजिल्हा बदलीने आल्यानंतर मी पहिली स्वजिल्ह्यातील शाळा म्हणून भोरमाळ या शाळेची निवड केली. शाळेत हजर झालो तेंव्हा एकच शिक्षक हजर होते. त्यांनी मला हजर करुन घेतले. परंतु त्यांची ही बदली झाल्याने मला त्यांना कार्यमुक्त करावे लागले. तसा पहिलाच दिवस माझी कुणाशीच ओळख नाही. थोडसे दडपण आल्यासारखे झाले. सुमारे तीन महिने मी शाळेवर एकटाच येणारा, भेटल्यानंतर नवीन गुरुजी आहेत वाटतं असं म्हणत एकटेच आहेत आता आमच्या शाळेचं कस होणार  असे म्हणत. मी मात्र आपल्या कामाला पहिल्या दिवसापासूनच सुरुवात केली. मुलांच्यात मिसळलो. जेवणाच्या सुट्टीत त्यांना जेवणासाठी माझ्याबरोबर घेतले. त्यांना फार आनंद झाला. नंतर हळूहळू मी संपूर्ण पालकांच्या ओळखी करुन घेतल्या. महिनाभर शाळेकडे कोणीही येणारा पालकवर्ग हळूहळू शाळेकडे येऊ लागला. एक महिन्यात संपूर्ण पालकांशी ओळख झाली. एके दिवशी पालकांची मिटींग आयोजित केली. श्रीगोंदा तालुक्यातील गोदामनगर शाळेस भेट दिली तेथील बालोद्यान उपक्रम शाळा पाहून पालक वर्ग भारावून गेला. शाळा पाहुन आल्यानंतर पालकांनी शाळेसाठी 15,000/- रु. देणगी जमा करुन बालोद्यान शाळेत उभे केले. मी एकटा असुनही 1 ते 4 चे वर्ग पाहून गुणवत्ता कमी होणार नाही याची काळजी घेतली. शालेय कामात लोकसहभाग जितका अधिक तितका शाळेची प्रगती अधिक Well Begun is half done.
2009-2010 साली लोकसहभागातून संगणक उपलब्ध केला. परंतु शाळेस विद्युतची सुविधा नसल्याने तो वापरात आला नाही. विद्युतीकरणासाठी 2 ते 3 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ही अनुदान मिळाल्याने शेवटी तत्कालीन शिक्षणाधिकारी श्री टेमकर साहेब यांची भेट घेतल्यानंतर 2012-2013 मध्ये 25500/- अनुदान दोन दिवसात मिळाले. त्यामध्ये आम्ही काही लोकसहभागातून टाकून लाईटची व्यवस्था केली. 2010 साली मुलांना बसण्यासाठी बाक, 2011-2012 या वर्षी मुलासाठी परिसरात मध्यान्ह भोजन बैठक व्यवस्था तयार करण्यात आली.
नोव्हेंबर 2014 महिन्यात अशीच पालकांची सहल नगर तालुक्यातील सुभाषवाडी आदर्श गाव हिवरे बाजार या ठिकाणी आयोजित करण्यात आली. सुभाषवाडी शाळेत गेल्यानंतर बाह्य परिसर आकर्षक वाटला नाही. परंतु वर्गात गेल्यानंतर मात्र पालकवर्ग भारावून गेला. रविवार सुट्टीचा दिवस असूनही विद्यार्थी संगणक प्रोजेक्टरच्या आधारे स्वत: शिक्षण घेत होते. तसेच काही विद्यार्थी स्वअध्यन कार्ड सोडवण्यात मग्न होते. त्यांचे शिक्षक त्यांना मार्गदर्शन करत होते. विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयावरील पकड, संगणक हाताळणी विचारलेल्या प्रश्नांचा हजरबाबीपणा पाहून पालक वर्ग आश्चर्य चकितच झाला. त्या शाळेचे शिक्षक श्री रमजान शेख सरांनी ते राबवत असलेले उपक्रम आणि संगणक प्रेाजेक्टरचा उपयोग याबद्दल मार्गदर्शन केले. डिजीटल शाळेची संकल्पना येथेच रुजली.
सन 2014-2015 वर्षात आज संगणकाच्या युगात आमची शाळा ही डिजीटल झाली पाहिजे हे स्वप्न बाळगलेल्या ध्येयवेड्या, चिकाटी आणि जिद्द बाळगणाऱ्या शिक्षकांच्या प्रयत्नांना लोकसहभागातून यशप्राप्ती देखील मिळाली. 13 डिसेंबर 2014 रोजी शालेय व्यवस्थापन समिती स्थापन केली आणि त्याच दिवशी व्यवस्थापन समितीमार्फत 51,000/- रु निधी जमा केला. LCD प्रोजेक्टर खरेदी करण्यात आला.
प्रोजेक्टर खरेदी केल्या नंतर श्रीगोंदा तालुक्यातील विस्तारअधिकारी श्री निळकंठ बोरुडे साहेब शाळेत येऊन व्यवस्थापन समितीला धन्यवाद दिले . शिक्षकांना प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्साह वाढवला. शाळेचे रुप बदलण्यास सुरुवात झाली. यापुर्वीही ग्रामस्थांनी शाळेला बालोद्यान, एक संगणक, बाके, मध्यान्ह भोजन बैठक व्यवस्था यासाठी योगदान दिलेले आहे. परंतु यावेळचा उत्साह हा औरच होता. लोकसहभाग वाढत जाऊन या निधीतून शालेय कमान, लोखंडी गेट, रंगरंगोटी बोलक्या भिंती, शैक्षणिक सॉफ्टवेअर, खेळण्याचे साहित्य, आकर्षक गणवेश, बालवाचनालय, झाडासाठी तुषार ठिबक सिंचन, पाणी पिण्यासाठी फिल्टर, इनव्हर्टर, गांडूळ खत आदि योजना राबवण्यात आल्या हे सर्व करत असताना विद्यार्थी गुणवत्ताही वाढली.
नुकतेच शाळेचे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. कार्यक्रमासाठी मा.आ.श्री राहुलदादा जगताप, जि.प.चे उपाध्यक्ष श्री.आण्णासाहेब शेलार, श्रीगोंदा प.स.सभापती सौ अर्चना ताई पानसरे,उपसभापती सौ.संध्याताई जगताप,जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी मा.श्री शैलेशजी नवाल साहेब,प्राथ. शिक्षणाधिकारी अशोक कडूस साहेब, माध्य. उपशिक्षणाधिकारी श्री. अरुण धामणे साहेब,शिक्षणाधिकारी श्री बडे साहेब ,उपशिक्षणाधिकारी सौ पठारे madam,गटशिक्षणाधिकारी श्री सय्यद साहेब,  विस्ताराधिकारी श्री अनिल शिंदे साहेब  श्री. बोरुडे साहेब,श्री पठाण साहेब,सौ.गर्जे madam,श्रीमती जयश्री कार्ले madam केंद्रप्रमुख श्री सागर साहेब,श्री ठुबे साहेब, यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामस्थ पदाधिकारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी शालेय उपक्रम विद्यार्थी कलागुणांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत दोन्ही शिक्षकांचा सत्कार केला. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव करत केला सुमारे 71,000/- रु निधी जमा झाला. शाळा व्यवस्थापन समितीने पुढील वर्षाचा सर्व मुलांचा शैक्षणिक खर्च व्यवस्थापन समिती मार्फत केला जाईल असे जाहीर केले. अल्पावधीत मनी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरले. आज माझा विद्यार्थी लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहे याचा मला अभिमान आहे. स्वंयमूल्यमापन, गुणवत्ता तपासणीत आमच्या शाळेला तालुक्यात तिसरा क्रमांक मिळाला.स्वंयमूल्यमापन शैक्षणीक गुणवत्ता मूल्याकनात शाळा जिल्हयात  पहिली आली. आज आमची शाळा ISO मानांकन प्राप्त आहे. 
याच शाळेला जि.प.अ.नगर चे मुख्यकार्यकारी अधिकारी मा.श्री शैलेशजी नवाल साहेब यांनी भेट देवून शालेय परिसर व गुणवत्ता पाहून कौतुक केले.गुणवत्तेवर खुश होऊन एका मुलास आपल्या खिशातील पेन बक्षीस दिला.आजपर्यत या शाळेला असंख्य शाळेतील शिक्षक व व्यस्थापन समितीतील सदस्यांनी भेटी देवून शुभेच्छा दिल्या आहेत.  हे सर्व करत असताना आमच्या शाळेचे तथकालीन  मुख्याध्यापक श्री धामणे वैजीनाथ  व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष रायकर सर्व थोर देणगीदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे सर्व शक्य झाले ते केवळ माझे स्वप्न, माझे ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती, माझ्यावर प्रेम करणारी माझे शिक्षक मित्रमंडळी आणि आम्हास मार्गदर्शन करणारे माझे अधिकारी वर्ग व माझे लाडके चिमुकले बालगोपाल  या सर्वाचा मी ऋणी राहिल.
धन्यवाद !



























स्नेहसंमेलन व नाविन्यपूर्ण उपक्रमांतून
फुलवले माळरान
वैजीनाथ विलास धामणे
जिल्हा परिषद प्राथ.शाळा भोरमाळ (हंगेवाडी),ता-श्रीगोंदा,जि-अहमदनगर
भ्रमणध्वनी :९९२१०९१९९१
शाळेची वेबसाईट-www.zppsbhormal.blogspot.in 


Text Box: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील कलागुणांचा विकास करून त्यातून सर्जनशील कलावंत घडवायचा असेल तर  त्यांच्या कलेला,अभिव्यक्तीला,कल्पनाविकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमापैकी एक  स्नेहसंमेलनाचे आयोजन करावे लागते.त्यातून विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित होऊन पालक व ग्रामस्थांचा शाळेकडे पाहण्याचा द्रुष्टीकोन बदलतो.चिमुकल्यांच्या कला विस्कारातून मिळालेल्या रकमेतून विविध सुविधा प्राप्त झाल्या आणि शाळेचा अंर्तरंग व बाह्यरंग बदलला अशीच एक शाळा.
           दर्जेदार शिक्षण देण्यासाठी भौगोलिक स्थितीचे बंधन नसते हे माळरानावरील भोरमाळ शाळेने सिध्द केले आहे.लोकसहभाग,लोकवर्गणी व विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे शाळा बोलकी आणि डिजिटल झाली आणि शहरातील शाळांपेक्षा ती अधिक आनंददायी झाली.
 ग्रामीण भागात पालक,गावकरी आणि शिक्षक एकत्र आले तर काय होते,हे भोरमाळ शाळेने दाखवून दिले.चिंचणी धरणाच्या पायथ्याला हंगेवाडी गाव.गावाच्या ईशान्येला   घोड धरणाचा कालवा जातो .त्याच्याच बाजूला माळरानावर भोरमाळ ही चारशे लोकसंख्येची वस्ती.परिसरात ५०-६० कुटुंबांचे वास्तव्य. धार्मिक आणि
ऐताहासिक पार्श्वभूमीने आधीच वलयांकित असलेल्या या गावाच्या मुकुटात जिल्हा परिषद प्राथ.शाळा  भोरमाळ या क्लास शाळेने मानाचा तुरा खोवला.संपूर्ण गावाला अभिमान असणाऱ्या अनेक गोष्टीपैकी एक गोष्ट म्हणजे आमची जिल्हा परिषदेची ही मराठी शाळा.चौथीपर्यंत असलेल्या या शाळेत तीस विद्यार्थी ई-लर्निग व कृतीद्वारे शिक्षण घेत आहे.सर्वांचे पालक शेतकरी मध्यंतरी सुविधांअभावी पटसंख्या घसरली,शाळा बंद पडण्याची वेळ आली.मात्र येथील शिक्षक श्री वैजीनाथ धामणे यांनी पुढाकार घेतला.
शिक्षकांच्या कल्पकतेने  विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असताना पालकांच्या इतर चांगल्या शाळेना भेटी व स्नेहसंमेलने या दोन बाबीच्या द्वारे लाखो रुपये वर्गणी जमा करून माळरान फुलवले.स्नेहसंमेलनाचे आयोजन या उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.मुलांचे सुप्त कलागुण बाहेर येऊन मुले बोलकी  झाली  छोट्या ३०  पटाच्या शाळेने तीन वर्षापासून दरवर्षी लाखो रुपये जमा करून खालील गोष्टी साध्य केल्या.
१)स्वच्छ व सुंदर शाळा-बोलक्या भिंती
माळरानावरही हिरव्या वनराईत विसावा घेतलेल्या शाळेच्या तिन्ही  बाजूंनी एका रांगेत उंच अशी झाडे,बाजूंनी कुंपण,मैदानात झाडाखाली भोजन बैठक व्यवस्था,बाजूलाच सुसज्ज बालोद्यान,इमारतीना सुंदर  रंगरंगोटी केली असून बोधपर सुवचने लिहिलेली.आकर्षक वर्ग सजावट.परसबाग,औषधी वनस्पती,हात धुण्याची व्यवस्था,मुलामुलींसाठी अद्यावत शौचालय,समोर गेट त्यावर इंग्रजीत शाळेचे नाव असलेली  आकर्षक कमान .
२)ई-लर्निग व इतर सुविधा
दोन्ही वर्गात LED व प्रोजेक्टर द्वारे अध्यापन त्यासाठी इन्होर्रटर सुविधा,साफ्टवेअर ,TAB सर्व मुले संगणक साक्षर,शुध्द पाण्यासाठी फिल्टर,बसण्यासाठी बेच,स्वयंअध्ययन कार्ड,खेळण्यासाठी  साहित्य,शा.पो.आहारासाठी फ्रीज आदि भरपूर सुविधा.ज्यामुळे सुट्टीत व शाळा सुटल्यावरही विद्यार्थी शाळेत रेंगाळतात.
३)इतर नाविन्यपूर्ण उपक्रम
शैक्षणिक सहली,किलबिल बँक,संस्कार शिबीर,बालआनंद मेळावे,वाढदिवस,परसबाग,झाडांना ठिबक व तुषार सिंचन,शालेय क्रीडा स्पर्धा,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,लेझीम पथक,सर्व मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्य  शाळेच्या वतीने मोफत वाटप,वृक्षारोपण आदि उपक्रम राबविले जात आहे.
४)इतर मान्यवरांच्या आजवर शाळेला झालेल्या भेटी
आजवर शाळेला सुमारे 900 ते १००० शिक्षक व व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी भेटी देऊन उपक्रमाची पाहणी केली आहे.आणि आपल्या शाळेचा विकास केला आहे.याच शाळेने कित्येक शाळेंना मार्गदर्शन करून इतर शाळा घडवण्यास मदत केली  आहे.आजवर शाळेला मा CEO साहेब,शिक्षणाधिकारी,गटशिक्षणाधिकारी व इतर अधिकारी वर्गानी तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी  भेटी देऊन शिक्षक व विद्यार्थ्यावर कौतुकाची थाप टाकली आहे.
५)शाळेस आजवर  मिळालेले पुरस्कार
               सन २०१४-१५ गुणवत्ता विकास कार्यक्रमात तालुक्यात तृतीय क्रमांक,तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला.तसेच तालुक्यात प्रथम ISO मानांकन मिळवणारी हीच भोरमाळ शाळा.तालुका स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक,वकृत्व स्पर्धेत तालुक्यात दिव्तीय क्रमांक,तसेच विविध स्पर्धा परीक्षेत राज्यात २०० पैकी २०० गुण घेऊन राज्यात प्रथम क्रमांक तर इतर ७  विद्यार्थी NSSE व मंथन परीक्षेत राज्य पातळींवर  गुणवत्तेत स्थान मिळवले.
                                              ६)फलनिष्पती
                पालकांना शाळा आपली वाटू लागली.लोकसहभाग वाढू लागला.अशा प्रकारे लोकसहभाग व स्नेहसंमेलानातून मिळणाऱ्या निधीतून,शिक्षकांच्या कल्पकतेतून, हितचिंतक व मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाने तसेच शाळेच्या  अविरात प्रयत्नांनी २० पटाची शाळा ३० पटावर गेली. शिक्षक,पालक व विद्यार्थी यांनी मनावर घेतले अन इच्छाशक्तीच्या जोरावर वाटचाल करण्याचा निर्धार केला तर किती कायापालट होऊ शकतो,याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भोरमाळ येथील शाळा.लोकसहभाग कसा मिळवायचा हे शाळेने इतर शाळेना दाखवून दिले.आज शाळेची  प्रगतीकडे घोडदौड सुरु आहे.म्हणून तर ही शाळा जिल्ह्यात प्रसिध्द आहे आणि ती ही जिल्हा परिषदेची.



1 comment:

  1. गावक-यांची साथ असेल तर शिक्षक नेहमीच उत्साही राहतात.

    ReplyDelete